भारतीय तत्वज्ञान विश्वस्त मंडळ सभागृह, भांडुप पूर्व येथे भांडुप पूर्व मंडळाच्या वतीने आयोजित मोदी@11 संकल्प सभा पार पडली
भारतीय तत्वज्ञान विश्वस्त मंडळ सभागृह, भांडुप पूर्व येथे भांडुप पूर्व मंडळाच्या वतीने आयोजित मोदी@11 संकल्प सभा पार पडली.
आपल्या देशाचे यशस्वी, दूरदर्शी आणि विकासाभिमुख पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यकाळाला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात मला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.
या 11 वर्षांमध्ये भारताने केवळ प्रगतीच साधली नाही, तर आत्मनिर्भरतेच्या दिशेने ऐतिहासिक झेप घेतली आहे.
जनधन योजना, आयुष्मान भारत, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या क्रांतिकारी योजना सामान्य नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडवून आणत आहेत.
या सभेमध्ये आपण पुन्हा एकदा संकल्प केला —
“सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण” या त्रिसूत्रीवर आधारलेले कार्य अविरतपणे सुरू ठेवण्याचा!
भांडुप पूर्व येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार, ज्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.












