Home Events मुलुंडमधील प्रलंबित विकासकामे व नागरी समस्यांबाबत महापालिका आणि MMRDA अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक!

मुलुंडमधील प्रलंबित विकासकामे व नागरी समस्यांबाबत महापालिका आणि MMRDA अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक!

Date

Sep 22 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

आज माझ्या कार्यालयात संबंधित महापालिका अधिकारी तसेच MMRDAच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मुलुंडमधील विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला.

यामध्ये LBS रोडवरील मेट्रोच्या कामामुळे बंद असलेल्या स्ट्रीट लाईट्स तातडीने सुरू करणे, निकृष्ट दर्जाच्या फुटपाथच्या कामाबाबत आवश्यक कार्यवाही करणे, GMLR वरील Atmosphere Society समोरील खड्डे तातडीने बुजविणे, प्रलंबित कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिकेडिंगबाबत योग्य ती कार्यवाही करणे, नाहूर ब्रिजवरील बस स्टॉप सुरक्षित व सोयीच्या ठिकाणी स्थलांतरित करणे तसेच मुलुंडमधील इतर विविध नागरी समस्यांवर चर्चा झाली.

या प्रसंगी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर या उपस्थित होत्या.

Please follow and like us: