मुलुंडमधील SRA रहिवाशांच्या OC व नागरी समस्या तसेच नाहूर गावातील पाणीप्रश्नाबाबत अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक!
मुलुंड पश्चिमेतील शंकरधन SRA व सल्पादेवी सदन SRA येथील रहिवाशांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या OC च्या प्रश्नासह विविध नागरी तक्रारी तसेच नाहूर गाव येथील जय भवानी CHS मधील रहिवाशांच्या पाणीप्रश्नाबाबत संबंधित महापालिका व SRA अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही व प्रभावी पाठपुरावा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.








