नवकार महामंत्र चौकाची स्थापना
सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ असा श्री नवकार महामंत्र.
या पवित्र महामंत्राच्या नावाने भारतातील पहिल्या चौकाची स्थापना पुण्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलुंड येथे, परम पूज्य पण्यास श्री राजधर्मविजयजी महाराज साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.
हा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भाग्याचा आहे.
या शुभ प्रसंगी जैन धर्माचे अनेक मान्यवर, साधु–साध्वी भगवंत तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.










































