संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जन्मभूमी वाराणसी येथून आलेल्या पवित्र कलशाचे मुंबईत आगमन झाले
संत शिरोमणी श्री गुरू रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त समरसता संकल्प अभियानांतर्गत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जन्मभूमी वाराणसी येथून आलेल्या पवित्र कलशाचे मुंबईत आगमन झाले. त्यानिमित्त मुलुंड पश्चिम येथील महाराणा प्रताप चौकात ईशान्य मुंबई जिल्ह्यातील जनतेच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
समरसता, समानता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा प्रेरणादायी सोहळा भक्तिभाव आणि जल्लोषात संपन्न झाला.

























































