होम मिनिस्टर (खेळ वहिनींचा) स्पर्धेची महाअंतिम फेरी
मुलुंड विधानसभा स्तरावरील होम मिनिस्टर (खेळ वहिनींचा) स्पर्धेची महाअंतिम फेरी मुलुंड पूर्व, तरुण उत्कर्ष शाळे समोरील मैदानात अत्यंत उत्साहात आणि भव्यतेने पार पडली.
मुलुंडमधील विविध 17 ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत 9000 पेक्षा अधिक महिलांनी जोशात सहभाग नोंदवला.
या संपूर्ण स्पर्धेत रोज सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच लकी ड्रॉद्वारे दररोज 3 भाग्यवान महिलांना पैठणी साडी भेट म्हणून देण्यात येत होती.
प्रथम पारितोषिक – २ व्हीलर दुचाकी
विद्या मालुसरे – केशवपाडा, मुलुंड पश्चिम
द्वितीय पारितोषिक – डबल डोर फ्रिज
शिवानी शिंदे – म्हाडा कॉलनी, मुलुंड पूर्व
तृतीय पारितोषिक – वॉशिंग मशीन
नितू प्रजापती – इंदिरानगर, मुलुंड पश्चिम































