झोपडपट्टी बांधवांना सर्व सुखसोयींनी युक्त सदनिकांचे चावी वाटप करण्यात आले
राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माझ्या खासगी कंपनीच्या माध्यमातून सत्यवादी SRA सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या संस्थेचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत प्रकल्प पूर्ण करून पात्र झोपडपट्टी बांधवांना सर्व सुखसोयींनी युक्त सदनिकांचे चावी वाटप करण्यात आले
स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणे म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि अधिक चांगले जीवन जगण्याची संधी मिळाली, याचा मनस्वी आनंद आहे.






































