Senior Citizen Cards तयार करण्याचा उपक्रम वार्ड क्रमांक १०४ च्या वतीने तांबे नगर येथे घेण्यात आला
ज्येष्ठ नागरिकांसाठी गरजेच्या असणाऱ्या विविध सवलती व सुविधा मिळवण्यासाठी त्यांचे Senior Citizen Cards तयार करण्याचा उपक्रम वार्ड क्रमांक १०४ च्या वतीने तांबे नगर येथे घेण्यात आला होता. या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कॅम्पमध्ये अर्ज स्वीकारल्यानंतर, तयार झालेली कार्डे आमच्या कार्यालयातून वाटप करण्यात आली. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
ही सेवा मिळवण्यासाठी वयोवृद्धांना कुठेही धावपळ करावी लागू नये, म्हणून हा उपक्रम स्थानिक पातळीवर राबवण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद हेच आमचे बळ!

