मुलुंड पूर्व, हरिओम नगर येथील डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यान पाहणी दौरा
मुलुंड पूर्व, हरिओम नगर येथील डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यान पाहणी दौरा
आज मुलुंड पूर्वेकडील डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यानाची पाहणी केली. या वेळी महानगरपालिकेचे गार्डन विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
उद्यानातील स्वच्छता, देखभाल, सुरक्षेची व्यवस्था, तसेच सुविधा वाढवण्यासंदर्भात स्थानिकांनी मांडलेल्या समस्या समजून घेतल्या. संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करत महापालिका अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना तात्काळ राबवण्याचे निर्देश दिले.
उद्यान हे सार्वजनिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे — त्याचा विकास व संवर्धन हा आपला सामूहिक प्रयत्न असावा!













