सहकारी संस्था, ‘टी विभाग’ कार्यालयाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले
पहाटे ५ ते ६ वाजेच्या सुमारास मुलुंड पश्चिमेकडील एसीसी सीमेंट रोड येथील उपनिबंधक, सहकारी संस्था, ‘टी विभाग’ कार्यालयाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तात्काळ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील जी यांची विधानसभागृहात भेट घेऊन, उपनिबंधक, सहकारी संस्था ‘टी विभाग’ कार्यालयास पहाटे लागलेल्या भीषण आगीमुळे निर्माण झालेली वस्तुस्थिती त्यांना समजावून सांगितली. जनतेच्या दैनंदिन सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी तात्काळ कार्यालयाकरिता जागेची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती केली ज्याने करून मुलुंडकरांचे सहकार विभागाशी संबंधित प्रश्न मार्गी लावता येणार.
या विनंतीला मा. बाबासाहेब पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “मी तातडीने कार्यवाही करतो,” असे आश्वस्त केले.
















