करोडो मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबुलनाथ महादेव मंदिरासाठी मोठी आनंदाची बातमी!
करोडो मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबुलनाथ महादेव मंदिरासाठी मोठी आनंदाची बातमी!
2012 पासून प्रलंबित असलेल्या मंदिराच्या लीज नूतनीकरणास मान्यता द्यावी व प्रतिवर्ष केवळ ₹१ इतके नाममात्र भाडे आकारावे, अशी मागणी मी तीन महिन्यांपूर्वी राज्याचे माननीय मुख्यमंत्री व आमचे नेते मा. श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडे केली होती. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही हा विषय प्रभावीपणे मांडला होता.
सांगताना अतिशय आनंद होत आहे की काही दिवसांपूर्वीच या मागणीस शासनाने मान्यता दिली. या शुभ निर्णयाच्या निमित्ताने आज राज्याचे महसूलमंत्री मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्यासोबत श्री बाबुलनाथ महादेव मंदिराचे दर्शन घेण्याचा योग आला.
या शुभप्रसंगी मंत्री श्री मंगलप्रभात लोढा जी उपस्थित होते.
या निर्णयासाठी राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार जी, आणि विशेष अभिनंदन राज्याचे महसूलमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे जी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.












