‘पालक प्रवास’ उपक्रम
राज्याचे मुख्यमंत्री, आमचे नेते मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या निर्देशानुसार ‘पालक प्रवास’ या उपक्रमांतर्गत उत्तर पूर्व मुंबई जिल्ह्यातील विविध समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी तसेच त्यावर प्रभावी कार्यवाही व्हावी यासाठी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या समवेत जिल्हा कार्यालयात उपस्थित राहून जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी पदाधिकाऱ्यांकडून विविध विषयांवरील निवेदने स्वीकारून समस्या जाणून घेतल्या.
यावेळी आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, जिल्ह्यातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


































