भाजप फक्त एक पक्ष नाही, तर राष्ट्रहितासाठी समर्पित विचारसरणी आहे
भाजप फक्त एक पक्ष नाही, तर राष्ट्रहितासाठी समर्पित विचारसरणी आहे. अधिकाधिक नागरिकांनी पक्षाशी जोडले जावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, यासाठी सदस्य नोंदणी अभियान हाती घेतले आहे. आज मुलुंड पश्चिम, कालिदास, तथास्तु बँक्वेट हॉल येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सदस्य नोंदणी अभियानाला गती येण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा केली. सर्वांनी अभियानाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं निश्चित केलं आहे. मुलुंडमधून विक्रमी सदस्य नोंदणी व्हावी यासाठी आम्ही कंबर कसली आहे.









