आज मराठी भाषा गौरव दिन. यानिमित्त सुमंगल प्रतिष्ठान व भारतीय जनता पक्ष (मुलुंड पूर्व) यांनी संयुक्त विद्यमाने “सागरा प्राण तळमळला” या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आलं. या नाट्य प्रयोगाच्या उद्घाटनास सांस्कृतिक कार्यमंत्री आ. श्री. आशिषजी शेलार उपस्थित होते.
स्वतंत्रवीर सावरकरांचे ज्वलंत चरित्र यातून अनुभवता आले. या नाट्यप्रयोगाचे आयोजन श्री. प्रभाकर शिंदे यांनी केले, त्यांचे विशेष आभार. वैभवसंपन्न मराठी भाषेच्या विकासासाठी आपण सर्व सदैव प्रयत्नशील राहू याची मला खात्री आहे.