जोडरस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामांचा शुभारंभ
मुलुंड पश्चिम, वॉर्ड 103 मधील वैभव हॉटेल येथील शहीद मंगल पांडे रोड तसेच वॉर्ड 107 मधील सेंट पायस चर्च समोरील एम.एम.एम व गोशाळा रोडला जोडणाऱ्या जोडरस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, नगरसेवक श्री. नील सोमैया तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच सुवर्णकार समाजातर्फे संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुलुंड पश्चिमेकडील संत नरहरी महाराज चौक येथे आयोजित 740 व्या पुण्यतिथी उत्सवात उपस्थित राहून त्यांना अभिवादन केले.




















