नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद | मुलुंड पुर्व – एकवीरा दर्शन चाळ परिसर भेट
नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद | मुलुंड पुर्व – एकवीरा दर्शन चाळ परिसर भेट
मुलुंड पश्चिमेतील एकवीरा दर्शन चाळ येथील स्थानिक नागरिकांनी परिसरातील समस्या माझ्या कार्यालयास कळविल्या. त्यानंतर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली.
मुख्य समस्या पुढीलप्रमाणे होत्या:
* चाळीच्या बाजूने गेलेल्या नाल्याची अपुरी सफाई
* मोडकळीस आलेली भिंत – सापांचा वावर वाढण्याचा धोका
* महापालिकेच्या शौचालयाचे बांधकामानंतर डेब्रिज न हटविल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता
यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील.
जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर







































