बैठकीत मुलुंड टी विभागातील विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली
आजच्या बैठकीत मुलुंड टी विभागातील विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. मुख्यतः रस्त्यांच्या पायाभूत सुविधांतील तुटफुट, रस्त्यावरील अवैध ऑप्टिक फायबर केबल्सची पसरलेली जाळी, योग्यरित्या उद्यानांची देखभाल, आणि खड्ड्यांचा प्रश्न महत्त्वाचा होता. आगामी काळात खड्डे रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबविण्याचे ठरवण्यात आले. याशिवाय, फेरीवाल्यांच्या गर्दीचा प्रश्न आणि विशेषतः बांगलादेशी फेरीवाल्यांच्या उपस्थितीवरही चर्चा करण्यात आली. या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत झोन 6 चे उपमहानगरपालिका आयुक्त संतोषजी धोंडे, टी विभागाचे सहाय्यक अधिकारी, पोलिस वरिष्ठ अधिकारी, वाहतूक वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

















