राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांनी गोरगरीब नागरिकांना हक्काचं घर मिळावं या दृष्टीने ही अभय योजना सुरु केली आहे
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांनी गोरगरीब नागरिकांना हक्काचं घर मिळावं या दृष्टीने ही अभय योजना सुरु केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांना गती मिळत आहे.
या शिबिराचे आयोजन आज मुलुंड पश्चिमेकडील दयानंद बैंक्वेट हॉल येथे करण्यात आले होते. शिबिरात नागरिकांना अंतिम परिशिष्ट-२, झोपडी हस्तांतरण, खरेदी-विक्री व इतर सर्व प्रक्रियेसाठी सविस्तर माहिती व थेट मदत मिळाली.
SRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर जी यांचे मनःपूर्वक आभार!
या प्रसंगी डॉ. मोहन नालदकर जी (सक्षम प्राधिकारी-८),
इतर मान्यवर, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





