लोककलेचा उत्सव – “The Folk आख्यान” ला भेट
लोककलेचा उत्सव – “The Folk आख्यान” ला भेट
महाराष्ट्र टाइम्सच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त मुलुंड पश्चिमेकडील महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे आयोजित मटा कॅलिडोस्कोप अंतर्गत आयोजित “The Folk आख्यान – आख्यानाचे आवतान” या कार्यक्रमास भेट दिली.
लोकसंगीत, नृत्य आणि पारंपरिक कलेच्या माध्यमातून आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवता आली.
या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी जी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी जी व इतर मान्यवर उपस्थित होते.
युवा पिढीला आपल्या लोककलेची ओळख करून देणारे हे उपक्रम निश्चितच स्तुत्य आहेत.
अशाच सांस्कृतिक कार्यक्रमांना नेहमीच माझा पाठींबा राहील.

























