Home Exotic Bird Park चा भूमिपूजन सोहळा Exotic Bird Park चा भूमिपूजन सोहळा

Exotic Bird Park चा भूमिपूजन सोहळा

Date

Jan 09 2026

Time

8:00 am - 6:00 pm

११० वर्षांनंतर मुंबईत नवे पक्षी उद्यान साकारत आहे.

मुलुंडमध्ये प्रस्तावित Exotic Bird Park चा भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे जी व उपमुख्यमंत्री मा. श्री अजित पवार जी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत पार पडला. हा सोहळा पालकमंत्री मा. श्री आशिषजी शेलार यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

मुलुंडकरांसाठी हा प्रकल्प प्रत्यक्षात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेला. संकल्पनेपासून अंमलबजावणीपर्यंतचा हा प्रवास आता प्रत्यक्षात उतरत आहे, याचा आनंद आहे.

या प्रसंगी माजी खासदार मा. मनोज कोटक जी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा उपक्रम मुलुंडच्या विकासाचा नवा टप्पा ठरेल

Please follow and like us: