मुलुंड पश्चिमेतील बाबू जगजीवन राम नगर येथील रहिवाशांकडून तक्रार प्राप्त झाली होती की, महानगरपालिकेमार्फत लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे त्यांच्या चाळीतील वेंटिलेशन पूर्णतः बंद झाले आहे


मुलुंड पश्चिमेतील बाबू जगजीवन राम नगर येथील रहिवाशांकडून तक्रार प्राप्त झाली होती की, महानगरपालिकेमार्फत लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे त्यांच्या चाळीतील वेंटिलेशन पूर्णतः बंद झाले आहे, परिणामी उष्णतेचा त्रास वाढला आहे. तसेच इतर काही समस्या देखील त्यांनी मांडल्या.
या तक्रारीची गंभीर दखल घेत मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
Please follow and like us:
0 views
Posted on April 22, 2025